नालासोपाऱ्यात एकाच तरुणाविरोधात दाखल झालेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण, मारहाण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात हिंदू धर्म, नवरात्रोत्सव आणि महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यासह महिलांचे अश्लील व्हिडीओ आंतरराष्ट्रीय क्रमांकावर पाठवल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.