अमरावती जिल्ह्यात 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या ऐतिहासिक कार्याची आठवण ताजी होत आहे. 'नाम' आणि जलसंधारण विभागाच्या करारातून वीरगव्हाण येथील तलावातील गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता दुप्पट झाली.... यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी २०० एकरावर गव्हाची पेरणी करत ४ हजार क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली. नानांच्या या प्रेरणेतून 'गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार' ही योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी....