नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील 900 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळालाय.जळगावचे दीपक परदेशी यांच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली. विशेष म्हणजे, शेतकरी आणि समाजातील गरजू घटकांसाठी काम करताना नाना केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर कुटुंबीयांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते फोनद्वारे सातत्याने संपर्कातही राहायचे .त्यामुळे नाना पाटेकर यांच्या आठवणींसोबतच त्यांच्या सामाजिक कार्याचा हा संवेदनशील पैलूही आज शेतकरी कुटुंबीयांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. याबाबत दीपक परदेसी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी