नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणखी सतर्क झालं आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी क्षेत्रीय विभागांच्या जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या रजांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. महसूल, कृषी, ग्रामविकास, महावितरण, पशुसंवर्धनसह महत्त्वाच्या विभागांच्या अधिकाऱ्यांना दुष्काळ निवारण कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळी परिस्थिती संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला रजा घेता येणार नाही किंवा मुख्यालय सोडता येणार नाही.