Nandurbar| शहाद्यात दुष्काळाची दाहकता वाढली; 8 एकर ऊस आणि 6 एकर केळीवर रोटोव्हेटर फिरवण्याची वेळ

शहादा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकऱ्यांवर उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील कवठळ येथील शेतकरी विनोद जाधव पाटील यांनी पाण्याअभावी आपल्या 8 एकर ऊस आणि 6 एकर केळीच्या बागेवर रोटोव्हेटर फिरवला आहे पाण्यासाठी त्यांनी 600 फुटांचे तब्बल 4 बोअरवेल घेतले, त्यासाठी 3 लाख रुपये खर्च केले मात्र एकाही बोअरला थेंबभर पाणी लागले नाही. आता लवकरच त्यांच्या 12 एकर पपईच्या बागेवरही रोटोव्हेटर फिरवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवणार आहे पावसाची दडी आणि भूजल पातळीत झालेली घट यामुळे शेतकरी अक्षरश हतबल झाला असून शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांची अशी दुर्दशा पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. Nandurbar | Severity of drought intensifies in Shahada; forced to run a rotovator over 8 acres of sugarcane and 6 acres of banana crops.

संबंधित व्हिडीओ