FDA अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर ? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार- Narhari Zirwal

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई करत पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही होऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात सध्या पाच ते सहा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून आणखी दोन ते तीन अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. Misuse of position by FDA officials? Action will be taken against the guilty officials – Narhari Zirwal

संबंधित व्हिडीओ