नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यानं दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळची ही घटना आहे.. हे प्रवासी कर्मभूमी एक्स्प्रेसने मुंबईवरुन बिहारकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत आणि जखमी प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.. दिवाळी सुट्टीनिमित्त हे प्रवासी गावी जात होते का याबाबत अजूनही माहिती नाही. नाशिक रोड पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे..दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..