Nashik| सप्तशृंगी मंदिरामध्ये 22 किलो चांदीचा अपहार; याचसंदर्भात मंदिराच्या विश्वस्तांची संवाद

नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये 22 किलो 490 ग्रॅम चांदीचा अपहार झाल्याची माहिती समोर आलीय.. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलीय.. सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात ही तफावत आढळून आली.. विशेष म्हणजे विश्वस्तांनी देवी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी गर्भगृहातील चांदी काढल्याची बाब विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आली आहे.दरम्यान या प्रकरणी देवी मंदिर अध्यक्ष, विश्वस्त आणि तत्कालीन अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी केलीय.. .

संबंधित व्हिडीओ