नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या अविनाश आव्हाड यांनी यंदा गौरी गणपतीसाठी घरातील संपूर्ण हॉलमध्ये कुंभमेळ्याच्या थीमवर सुंदर अशी आरास साकारली आहे. कलशातून अमृत थेंब जिथे पडले ते कुशावर्त, रामकुंड दाखवण्यापासून ते धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकचे अध्यात्मिक महत्त्व त्यांनी आपल्या या देखाव्यातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचे काम प्रशासनाचे असले तरी मात्र नागरिकांनी देखील त्यात हातभार लावावा असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान कशी आहे ही आरास बघूयात.