Nashik| भाऊसाहेब चौधरींकडून रेणुका मातेचं दर्शन, दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी देवीला साकडं

नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिकच्या चांदवड येथील रेणुका मातेचं दर्शन घेतलं.राज्यावरील दुष्काळाचं संकट दूर होऊ दे, असं साकडं त्यांनी देवीला घातलं. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, पाणीटंचाईच्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन चौधरी यांनी दिलं.प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्वतोपरी मदत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ