Nashik Crime News | नाशिक उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने नियुक्तीपत्र । NDTV मराठी
Nashik Crime News | Appointment letter issued using Nashik Deputy Collector's forged signature | NDTV Marathi
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने महसूल सहाय्यकाचे बोगस नियुक्तीपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तन्मय देसले याची महसूल सहाय्यक पदावर बनावट नियुक्ती करण्यात आली. मालेगाव तहसील कार्यालयातील पदासाठी हे बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पाच पानी नियुक्तीपत्रावर उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांची बनावट सही, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय आणि महसूल विभागाचे बनावट शिक्के वापरल्याचे समोर आले आहे.