नाशिकच्या सिडको परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून एका चिमुरड्याला बेदम मारहाण करण्यात आली. दुकानामधल्या काउंटर ला धक्का लागला आणि काउंटर वरच्या काही वस्तू खाली पडल्या. या आणि इतक्याशा कारणामुळं दुकानदारानं आठ वर्षांच्या लहान मुलाला बेदम मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणात आता नाशिक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.