उद्या दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थ परिसरात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने या सोहळ्याला विशेष महत्त्व असून, प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.या तयारीचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी....