नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी विकास काम सुरू आहेत. रामकुंडावरील लक्ष्मण कुंड येथे देखील काँक्रिटीकरण करण्याचा काम करत जेसीबीच्याद्वारे तोडफोड केली जातेय.या कामाच्यादरम्यान गंगा गोदावरीला दक्षिण वाहिनी म्हणून ओळख आणि महत्त्व आहे हे पौराणिक महत्त्व नष्ट करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असल्याचा आरोप गोदाप्रेमी करत आहेत. गंगा गोदावरीच्या लक्ष्मण कुंडामधील गंगा गोदावरी नदीचा प्रवाह बदलवून दक्षिण दिशेला पाणी वाहण्याऐवजी पूर्वेच्या दिशेला गोदावरीचा प्रवाह बदलण्याचा घाट प्रशासन घालत असल्याने गोदाप्रेमी आक्रमक झाले आहेत.