उद्या नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण पार पडणार आहे. उद्या 12 वाजून 2 मिनिटांनी फडणवीसांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी साधू-महंतांचीही उपस्थिती असणार आहे. मात्र, कुशावर्त तीर्थ परिसरात भाविकांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने प्रशासनाकडून संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरात ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या स्क्रीनच्या माध्यमातून ध्वजारोहण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भाविकांना पाहता येणार आहे.
या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.