Nashik| पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणातील लेटेस्ट अपडेट NDTV मराठी

नाशिकच्या पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आत्तापर्यंत 57 संशयित आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी 25 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. गंभीर बाब म्हणजे संशयित आरोपींमध्ये मविआ नेत्यांचाही समावेश आहे. यामध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेख यांचाह समावेश आहे. एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला नाशिक हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली.दर्गा अतिक्रमण कारवाईदरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता. हल्ल्यात २१ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी तर २५ ते ३० वाहनांची तोडफोड झाली. दरम्यान, मोबाईल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ