Nashik| तपोवन परिसरातील प्लायवूडच्या गोदामाला भीषण आग, आगीत गोदाम जळून खाक | NDTV मराठी

नाशिकच्या तपोवन परिसरातील प्लायवूडच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदाम जळून खाक झाले.रात्री 12 च्या दरम्यान आग लागल्याचे समजते.आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.मात्र लाकूड असल्याने आगीने रुद्ररूप धारण केलं. परिसरातील आणि शेजारील गॅरेज, गोदामाला आगीच्या प्रचंड झळा बसल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे परिसरातील वीज देखील बंद करण्यात आली होती.अनेक अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून रात्री उशीरा आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

संबंधित व्हिडीओ