थोड्याच वेळात नाशिकमध्ये आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.. 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 501 वादकांच्या हस्ते हा शंखनाद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सामूहिक शंखनादाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या भव्य कार्यक्रमासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून या परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
Nashik News | 501 conch-shell blowers participate in a grand 'Shankhanad' (conch-blowing) ceremony on the banks of the Godavari | Kumbh Mela