काठे गल्ली परिसरातील दर्ग्याचं पाडकाम पूर्ण झालंय. पखाल परिसर ते काठे गल्ली परिसरात काल रात्रीच्या दरम्यान दगडफेकीची घटना घडलीय. यात 10 ते 12 पोलीस जखमी झालेयत. तसंच पोलीस वाहनांचं नुकसान झालंय.. या परिसरात असलेल्या अनधिकृत दर्ग्यातील बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेचं पथक जाणार होतं.त्या पार्श्वभूमीवर आक्रमक होत, काही लोकांनी दगडफेक केल्याचं बोललं जातंय. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. सकाळी देखील परिसरात तणाव होता. आणि 500 पोलीस कर्मचारी दाखल झालंय. तसंच SRPF -3 तुकड्या आणिदंगल नियंत्रण पथकही घटनास्थळी तैनात आहे. कालच्या दगडफेक प्रकरणी 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 50 दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केल्यायत. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.