नाशिकच्या रामकुंडावर छटपूजेनिमित्ताने उत्तर भारतीयांची तुफान गर्दी झाली आहे. एक वर्षापूर्वीच कुंभमेळा भरल्याचा अनुभव आज नाशिककरांना येतोय. सालाबादप्रमाणे यंदाही नाशिकमधील उत्तर भारतीय कुटुंब अर्घ्य देण्यासाठी गोदावरीच्या काठावर एकत्र आले आहेत. रामकुंडावर स्नान करून विधिवत पूजा केली जात आहे. प्रशासनाने पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक मार्गात बदल केले आहेत.