नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पूजा विधींसाठी प्रशिक्षित पुरोहितांची गरज बघता सरकारतर्फे नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रशिक्षणासोबत आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडविण्याचा हा प्रयत्न आहे. याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांसह पुरोहितांकडून विरोध केला जात असून हे धर्मशास्त्राविरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे..