Nashik| रामकुंडात चप्पल,बूट, कपडे फेकल्याचा प्रकार; संबंधितांवर कारवाई करण्याची तुषार भोसलेंची मागणी

रामकुंड परिसरात रंगपंचमीदरम्यान झालेल्या हुल्लडबाजीप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे. स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत काही जणांनी चपला-बुट तसेच कपडे रामकुंडात फेकल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकार गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न करत असताना अशा प्रकारांमुळे गोदाप्रेमी आणि नाशिककरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित व्हिडीओ