नवी मुंबईत झालेल्या भव्य वाहतूकदार मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील वाहतूक कोंडी, शहरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली. शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे गंभीर होत असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नसून केवळ राजकीय इच्छाशक्ती हवी, असं राज ठाकरे म्हणाले. राज्य सरकारला अनेकदा प्रस्ताव दिले, मात्र त्यावर कोणतीही ठोस कृती झाली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. याचवेळी, महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी आतुरतेने वाट पाहतोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठी जनतेला थेट साद घातली.
Navi Mumbai | "I am waiting to see when you will hand over power to me," says Raj Thackeray at a gathering of transporters.