Navi Mumbai वाहतूक पोलिसांनी 5 हजारांची लाच मागितल्याचा Video Viral,तक्रारदार NDTV मराठीवर Exclusive

नवी मुंबईच्या बेलापूर येथील सिडको कार्यालयाबाहेर वाहतूक पोलिसांवर वसुलीचे आरोप करण्यात आलेत.. रात्री साडेआठच्या सुमारास सौरभ तिवारी यांच्याकडे 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय.. या कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय..ड्रिंक अँड ड्राइव्ह कारवाईच्या नावाखाली वाशी, बेलापूर आणि पाम बीच परिसरात मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओतील आरोपांची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे..

संबंधित व्हिडीओ