महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ धुळ्यातील श्री एकविरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मंदिर प्रशासनाकडून अगदी जय्यत तयारी करण्यात येते. नवरात्रोत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असतात.