राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? आज दिल्लीत होणार फैसला? दोन्ही राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा.राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर.उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर.राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेणार भेट.यावेळी राष्ट्रवादी चे खासदार आणि वरिष्ठ नेते नेते सुनेत्रा पवार यांच्या सोबत राहणार असल्याची माहिती.विशेष बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विलीनीकरण संदर्भात चर्चा होण्याची शक्यता.उपराष्ट्रपतींना राज्यसभेचा राजीनामा देतील.सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याअगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते.