NCP Merger | विलिनीकरण झाल्यास एकमताने काम करणार ? काय म्हणाले उमेश पाटील- विकास लवांडे ?

विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना आता घडामोडींना वेग आलाय. प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळेंनी दिल्लीत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दोन्ही नेत्यांमध्ये 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. या बैठकीनंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून NCP च्या आमदारांना फोन करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आपलं मत काय, याबाबत आमदारांसोबत फोनवरून चर्चा करण्यात आल्याचं समजतंय. विलीनीकरणाबाबत आमदारांचं मत विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ