राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काल रात्री देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर पक्षसंघटना वाढ आणि पक्षातील अंतर्गत कुरघोडी या विषयांच्या संदर्भात सर्व आमदारांसोबत या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.