Raigad मध्ये NCP vs Shivsena वाद; महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका; अनिकेत तटकरेंनाही डिवचलं

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी पुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरेंवर जोरदार टीका केलीय. रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप खरे असून तटकरेंची लवकरच पक्षातून हकालपट्टी होणार असल्याचा दावा महेंद्र दळवींनी केलाय. तटकरेंच्या हातून सगळेच निघून गेलंय त्यांना कोणी मदत करू नका असंही आवाहनही त्यांनी केलंय. अनिकेत तटकरे हे सरगोसी मुलगा असल्याची टीकाही महेंद्र दळवींनी केलीय. आगामी निवडणूकीतही सुनील तटकरेंना पाडणारच असा दावाही त्यांनी केलाय.. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ