केबीसीच्या हॉटसीटवर प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि 50 लाख रुपये जिंकले. पण आज निसर्गाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र या शेतकऱ्याकडेही नाही.पैठण तालुक्यातील गाव तांडा येथील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड यांची ही कहाणी. दोन एकरांत कापूस लावला, त्यासाठी जवळपास ५० हजार रुपये खर्च केले. मात्र पाण्याअभावी पीक संकटात आलं आणि केलेला खर्चही निघेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीय. केबीसीने आर्थिक आधार दिला, पण दुष्काळाने शेतीचं गणितच बिघडवलं. एकीकडे 50 लाखांचं बक्षीस आणि दुसरीकडे पाण्याविना करपणारं पीक, निसर्गाच्या या विरोधाभासासमोर कुंटेवाड आज हतबल झाले आहेत. त्यांची व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...