भारत पाकिस्तान युद्ध छेडल्यापासून भारताच्या दोन महिला अधिकारी फारच चर्चेत आहेत. भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया खुरेश यांनी पत्रकार परिषद घेत हल्ल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेनंतर सर्वांनाच दोन महिला अधिकारी कोण आहेत हे जाणून घ्यायच आहे. म्हणूनच अनेक जण सोशल मीडिया वर त्यांचा शोधही घेताय. विशेष म्हणजे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या नावे एक सोशल मीडिया अकाउंट देखील दिसतायत. मात्र हे दोन्ही एक सोशल मीडिया अकाउंट हे खोटे असून या अकाउंट वरून दिलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जातंय.