हिंगोली जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध दाखल्यांसाठी शासकीय शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणी जात असल्याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती.. या बातमीची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालकावर निलंबनाची कारवाई केलीय..पाहुयात एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टचा हा विशेष रिपोर्ट.