Mसंतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय.या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. मात्र धनंजय मुंडेंवर आरोपांचे घाव करणाऱ्या सुरेश धसांनाच आता मायेचा पाझर फुटलाय.. सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंची भेट घेतली. या भेटीसाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी मध्यस्थी केली. त्यामुळे बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय.. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीचं नेमकं कारण काय? पाहुयात या रिपोर्टमधून..