अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली.भारत से आया मेरा दोस्त, अशा थाटातच ट्रम्प यांनी मेदींचं स्वागत केलं.ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जो निर्णयांचा धडाका लावलाय. तो पाहता मोदी आणि ट्रम्प यांच्या या भेटीला अतिशय महत्त्व होतं.या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे दोन्ही देशांचंच नाही, तर सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेदरम्यान महत्त्वाचे करार झाले, दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्याचं ठरलं.पण त्याहीपेक्षा ट्रम्प यांनी ज्या प्रकारे मोदींचं स्वागत केलं, ते भारत-अमेरिका मैत्रीबद्दल अनेक गोष्टी अधोरेखित करणारं ठरलं.