वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले आणि त्यानंतर नॅशनल बोर्ड ओएफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स नं हा निर्णय जाहीर केलाय. नीट परीक्षा पंधरा जूनला दोन शिफ्ट मध्ये घेण्यात येणार होती. पण परीक्षा आता दोन शिफ्ट मध्ये न घेता एका शिफ्ट मध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.