कोकणच्या पर्यटनाला एक नवा आयाम देत, माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांची भव्य हाऊसबोट दाभोळ खाडीमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही हाऊसबोट ८ रूम्स असलेली महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट आहे, ज्यामुळे कोकणच्या जलपर्यटनाला एक आलिशान अनुभव मिळणार आहे. कोकणातील खाड्या बोटीच्या माध्यमातून जोडून डॉ. मोकल यांनी यापूर्वीच कोकणच्या पर्यटन क्षेत्रात वेगळी क्रांती केली आहे.