पुणे शिक्षक मतदार संघातून शिंदे गटाने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिलाय. या मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असताना, शिंदे गटाचा हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. सुरुवातीला शिंदे गटाकडून इच्छूक असलेले मंगेश चिवटे यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यानंतर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल अशी आशा होती.. मात्र एकनाथ शिंदेंनी सचिन सानप यांना पाठिंबा देत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय..