Amravati Airportच्या सुरक्षा व्यवस्थेचा निलेश हेलोंडे पाटलांना फटका, पोलिसांकडून आत जाण्यास मनाई

अमरावती विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा राज्यमंत्री दर्जा असलेल्या निलेश हेलोंडे पाटलांना फटका बसलाय.राज्यमंत्री दर्जा असलेल्या हेलोंडे पाटलांना पोलिसांनी आत जाण्यास मनाई केली. त्यामुळे अमरावती विमानतळावरील सुरक्षेतील असमन्वयाचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय.हेलोंडे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.हेलोंडे हे वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत. अमरावती विमानतळावर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व पोलिसांमध्ये वादावादी झाली. शिंदे गटांच्या जिल्हाप्रमुखांना आत प्रवेश न दिल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत. अमरावती विमानतळावर शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीये.विमानतळावरील पासेस न दिल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत.प्रशासनाकडून शिवसैनिकांसोबत दुजाभाव केल्याचा आरोप या संदर्भात आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी.

संबंधित व्हिडीओ