कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झालीय.कणकवलीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिखलफेक प्रकरणातून नितेश राणे 504 या गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे... त्यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास आणि 1 लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासोबतच्या 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना जुलै 2019 मध्ये उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.