राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणावरून वाद सुरू असतानाच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, "ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो," असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.