Global News| Israel मध्ये कुणालाच बहुमत नाही, नेतान्याहूंच्या जवळच्या पक्षाची विरोधी गटाला ऑफर ?

इस्रायलमध्ये अखेर निवडणूक निकाल जाहीर कऱण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी उशिरा इस्रायलच्या निवडणूक समितीनं हे निकाल जाहीर केले. त्यानुसार नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाच्या आघाडीला सर्वाधिक म्हणजे ५३ जागा मिळाल्या आहेत. गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वातील गटाला ४८ जागा मिळाल्या आहेत. मात्र दोघांनाही बहुमत गाठता आलेलं नाही. त्यामुळे तिथं आता निवडणुकीनंतरच्या वाटाघाटींना प्रचंड वेग आलाय. पुढील ४२ दिवसांत इस्रायलच्या या राजकीय पक्षांना सत्ता स्थापन करणं गरजेचं आहे. अन्यथा फेर निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. अशात आता गादी आयझेनकोट यांना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचं समजतंय. नेतान्याहूंच्या आघाडीतीलच पक्ष असलेल्या 'युनायटेड तोराह ज्युडाइझम'नं आयझेनकोट यांनी हा प्रस्ताव पाठवलाय.

संबंधित व्हिडीओ