परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं टेन्शन कायम आहे, रिक्षा, टॅक्सी चालक युनियनच्या उत्तर भारतीय नेत्यांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली.यावेळी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढीची मागणी या उत्तर भारतीय नेत्यांनी केली, पण तूर्तास मुदतवाढ न देण्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतलीय.उद्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करूनच मुदतवाढ द्यायची की नाही याचा निर्णय घेऊ असं प्रताप सरनाईकांनी सांगितलंय.त्यामुळे तूर्तास मुदतवाढीचा निर्णय उद्यावर गेलाय, तर मुदतवाढीचा विचार करू पण मुजोरी चालणार नाही असं देखील सरनाईकांनी म्हटलंय,