विठ्ठलाच्या दारात VIPनाही दर्शनावरून दुजाभाव? मुनगंटीवार ताटकळत,तर मंत्री गुलाबरावांना थेट दर्शन?

आषाढी वारीदरम्यान व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही पंढरपुरात पहिल्याच दिवशी व्हीआयपी दर्शनावरून मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबीयांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या काही व्यक्तींना थेट दर्शन घडवल्याचा दावा केला जातोय, तसे व्हिडीओही समोर आलेयत.. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून आपण दर्शनासाठी आलो होतो, मात्र मंदिरात समन्वयाचा अभाव असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपण लोकप्रतिनिधी असून अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो, त्यामुळे दर्शन मिळालं पाहिजे, असं सांगत आपल्यासोबतच्या काही लोकांना थेट दर्शनाला सोडल्याची कबुली दिली.

संबंधित व्हिडीओ