Samruddhi Mahamarg च्या प्रवासात आता पोटापाण्याची सोय, महामार्गावर 8 ठिकाणी उपाहारगृहे सुरू होणार

नागपूर ते मुंबई ७०१ किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा आता उपाहारगृहे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना खानपान आणि स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध होणार आहे. एकूण २२ ठिकाणी विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून यापैकी ८ ठिकाणी उपाहारगृहे सुरू झाली आहेत. मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकवर महऱ्हाळ, डवाळा, वर्झाडी, मांडवा, रेणुकापूर या ठिकाणी उपाहारगृहे सुरू झाली आहेत. तसेच नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर वर्झाडी, मन्हाळ, आमणे या ठिकाणी उपाहारगृहे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. यापैकी मन्हाळ येथील उपाहारगृहाचे लोकार्पण आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.

संबंधित व्हिडीओ