#LaxmanHake #OBCProtest #AudioViral ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची एक कथित व्हॉट्सॲप ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एक व्यक्ती त्यांना आंदोलनासाठी मदत म्हणून पैसे देऊ करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. त्यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. या व्हायरल ऑडिओमुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.