राज्यातून मान्सूनची माघार सुरू झाली असतानाच ऑक्टोबरची झळ नागरिकांना चांगलीच जाणवू लागली आहे...मागील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाली असून, विशेषतः कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाड्याचा कहर पाहायला मिळत आहे...मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे....दरम्यान, रत्नागिरीत १४३ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून मुंबईतही ४६ वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये तापमानाचा विक्रम नोंदवला गेला आहे...कमी पाऊस, वाढती उष्णता आणि एल निनोचा प्रभाव यामुळे यंदाचा ऑक्टोबर राज्यासाठी अधिक तापदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.