राज्यातील शिवसेना राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झालाय… धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मोठा निर्णय घेत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा मार्ग स्वीकारलाय. कार्यकर्त्यांशी दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक जबर धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय नाट्याला आता क्लायमॅक्स मिळाल्याचं चित्र आहे. दरम्यान, पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर परिस्थिती अधिकच तापली. या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचा दावा स्वतः ओमराजेंनी केला आहे.