काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचे जीव गेले.महाराष्ट्रातील सहा जणांचा या मृतांध्ये समावेश आहे.मुंबई, पुण्याचे पर्यटक काश्मीरचा निसर्ग पहायला गेले होते.. पण त्यांचा घात झाला.कशाशाही काहीही संबंध नसताना दहशतवाद्यांनी त्यांना टिपून टिपून मारलं.ज्या कुटुंबातील लोक मारले गेले त्यांनी आपल्या नातलगांना डोळ्यासमोर मरताना पाहिलं. त्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातील भीती पाहताना आज अवघा महाराष्ट्र हळहळलाय.