Paithan | आजपासून 'नाथषष्ठी' सोहळ्याचा शंखनाद, अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठुनामाचा गजर

छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पैठण नगरीत आजपासून 'नाथषष्ठी' या सोहळ्याचा शंखनाद झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठूनामाचा गजर करत लाखो वारकरी पैठणमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि पश्चिम महाराष्ट्रातील दिंड्यांचे आगमन झाल्याने गोदाकाठ भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि भानूदास-एकनाथांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला असून, आजही राज्याच्या विविध भागांतून दिंड्यांचा ओघ सुरूच आहे. पंढरीच्या वारीप्रमाणेच पैठणची वारीही शिस्तबद्ध असते. गोदावरीच्या विस्तीर्ण वाळवंटात आणि पैठण शहराच्या गल्लीबोळात वारकऱ्यांनी आपल्या राहुट्या ठोकल्या आहेत. वाळवंटात ठिकठिकाणी भजन, कीर्तन आणि भारुडांचे कार्यक्रम रंगू लागले आहेत.

संबंधित व्हिडीओ