पालघर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झालाय. गुजरातहून मुंबईकडे येत असताना बसचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातात मिनी ट्रॅव्हलरमधील १६ प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.